यांचे नियम न पाळल्याने, सतत जेवताना दाताखाली खडा आल्यासारखे वाटते. काहीवेळा ओळींचा अर्थ लावून वाचावे लागते. लिखाणाचा ओघ कायम राहत नाही. शुद्धलेखन तपासणी यंत्राचा वापर करावा. काही मजकुराची पुनरावृत्ती झाली आहे. टंकीत केल्यावर प्रकाशित करण्यापूर्वी एकदा वाचून तरी बघायला हवे. (चुकून सुनिताबाईंनी वाचले तर रागावल्याशिवाय राहणार नाहीत. त्या शुद्धलेखनाच्या बाबतीत काटेकोर होत्या. प्रुफे तपासण्याचे काम त्या अगदी मेहनतीने करीत असा "आहे मनोहर तरी" मध्ये उल्लेख आहे. आपल्याला माहीत असेलच.)

आपण हा लेख इथे दिलात त्याबद्दल धन्यवाद. थोडे अधिक काम केल्यास वाचणे सुखकर होईल.

--सीमा