पण हे प्रसंग खरच इतके खुसखुशीत होते का? का हि सगळी लेखकाची किमया हे कळायला मात्र काही मार्ग नाही.
बहुदा दैनंदिन आयुष्य हे काळेपांढरेच असते. लेखकाला त्यात आपल्या प्रतिभेचे रंग भरावे लागतात.तसेच इथेही झाले आहे. अतिशयोक्ती आणि अपेक्षाभंग या विनोदनिर्मितीच्या दोन्ही आयुधांचा योग्य वापर. काहीकाही वेळा अतिरंजित वाटले तरी एकंदरीत लिखाण प्रसन्न आणि चैतन्यपूर्ण आहे.