कुठल्याही विषयाची मांडणी करण्यापूर्वी त्या विषयाचा केलेला सखोल अभ्यास पुलंच्या लिखाणात ठिकठिकाणी जाणवतो. साध्या साध्या उपमा, दृष्टांत वाचल्यावर वाचकाला जाणवते... अरे! किती साधी आणि चपखल उपमा आहे! आपल्याला का नाही असे सुचत? तिच पुलंची प्रतिभा असावी.
'नकटं व्हाव, पण धाकटं होऊ नये' म्हणतात. त्याच चालीवर 'मठ्ठ व्हावं, पण लठ्ठ होऊ नये'. अशी एखादी म्हण मायबोलीच्या चरणी अर्पण करायला हरकत नाही.
मी शेकडो बारीक माणसं सपाटून खाताना पाहीली आहेत; पण त्यांच्याविरुद्ध अधिक खाण्याचा सकृद्दर्शनी पुरावा नसतो.
'हरहर महादेव'ही आरोळी रणक्षेत्राप्रमाणं वरणक्षेत्रादेखील उठत असे.
इत्यादी इत्यादी ग्रेटच आहे पण सर्व सणावारांतून खायचे पदार्थ काढून टाकले तर उरते काय? हा प्रश्नही सार्थ वाटतो.
अवांतर:
"उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म" म्हटलंय ते काय उगीच? जठराग्नीला भरपूर आहूती पडल्या पाहिजेत.
माझ्या ''यज्ञकर्म कॅटरिंग सर्विसेस' (यज्ञकर्म उपहार सेवा) ह्या कंपनीचे, 'उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म' हे घोषवाक्यच आहे, हे सहज जाता-जाता.