इथे प्रतिसाद देऊन अथवा व्यनितून संपर्क साधून सार्थ मदतीचा/शुभेच्छांचा हात पुढे करणाऱ्या सर्व मनोगतींचे मन:पूर्वक आभार.
सध्ध्यातरी बाबांचे दुखणे खूपच जास्त असल्याने त्यांना स्थानिक डॉक्टरांनी पूर्णपणे बेडरेस्ट घ्यायला सांगितली आहे. दिलेल्या गोळ्या-मलमामुळे त्यांना बराचसा आराम पडतो आहे असे म्हणाले. मी त्यांना भेटायला जाऊन आले काल-परवा तर चेहरा खुलला होता त्यांचा बऱ्यापैकी पण ते लपवत असलेली वेदना जाणवत होती. "भोप्या, तू आलायस ना.. आता मला काही होत नाहीये." असं म्हणत रडले आणि मग मलाही रडू आलं. असो. महिनाअखेरीपर्यंत त्यांना सध्ध्याच्या दुखण्यातून आराम व्हावा अशी अपेक्षा आहे जेणेकरून जूनच्या पहिल्या आठवड्यात पुढील उपचाराची सुरूवात करता येईल.
"मुंबईपुणं खूप खर्चिक आहे, तिथे जाऊन काय फरक पडणार आहे? पैसे जातील उगाच.. आता वयोमानाप्रमाणे हाडं झिजणार आणि त्रास होणारच. झिजलेल्या हाडांवर पैशाचा मुलामा देऊन काय होणार आहे.. पेक्षा जेव्हा दुखेल तेव्हा औषधगोळ्यामलमं होतातच आहेत ना? बरं वाटतंय मला त्याने. तू उगाच हा नसता खर्च काढू नकोस." इति बाबा ! असंच काही दुखणं मला असतं तर असंच बोलले असते का ते? नाही ! तेव्हा माऽऽर जज्जत तोडून हा नाही तो डॉक्टर.. तो नाही तो.. करत हिंडले असते आणि अत्युत्तम उपचार करून घेतला असता.. मग स्वतःच्या तब्ब्येतीबद्दलच इतकी उदासीनता ती का? मी काही करू इच्छिते तर माझ्या पायात बेड्या ठोकणं ते का? मनस्वी संताप होतो माझा.. पण आता त्यांना शांतपणे मनवणे भाग आहे, ते कसे करता येईल याचाच विचार करते आहे.
वेदश्री.