धन्यवाद.

१. उत्तरप्रदेश हे राज्य खरोखरच देशाचे राजकारण फिरवण्याची क्षमता असलेले राज्य आहे काय?
'फिरवण्याची' हो. पूर्णपणे 'ठरवण्याची' नाही.
२. बसपा ला विजय मिळाला तो ब्राह्मण दलित सहमतीने की भाजप, सपा, काँग्रेस ह्यांच्या चुकांमुळे?
दलित ब्राह्मण सहमतीने.
३. ह्या लाटेत ह्या तिन्ही पक्षांची बेटे उद्ध्वस्त झाली आहेत हे पटते का?
उद्धवस्त व्हायला कॉंग्रेसजवळ फारसे नव्हतेच. समाजवादी पक्षाविरुद्ध तात्कालिक असंतोष (अँटी इंकंबंसी) असू शकतो. आणि सुमारे १०० जागा म्हणजे काही वाईट नाही. भाजप मात्र उद्धस्त झाले आहे असे म्हणता येईल. आता ५० म्हणजे पुढच्या निवडणूकीत कॉग्रेसच्या बरोबरीने रसातळाला जायची क्षमता आहे.
४. ह्या निवडणुकीची छाया राष्ट्रपती निवडणुकीवर कशी आणि कितपत पडेल असे तुम्हाला वाटते?
निश्चित सांगता येत नाही. कदाचित एखादा दलित किंवा उत्तरप्रदेशी ब्राह्मण राष्ट्रपती होईल.

तीन महत्त्वाचे मुद्दे विसरले आहेत किंवा मटाने मुद्दाम गाळले आहेत.

५. मायावती निवडणूक काळात एकदाही प्रसारमाध्यमांसमोर आल्या नाहीत. त्याचा त्यांना फायदाच झाला का? प्रसारमाध्यमांसमोर न येता निवडणूक जिंकता येऊ शकते हेच तर सिद्ध झाले नाही ना?
६. अब्दुल कलाम आणि इतर अनेकांना देशात द्विपक्षीय पद्धती यावी असे वाटत होते. ह्या निकालाने त्या प्रक्रियेला धक्का बसला असे वाटते का?
७. मनुस्मृतीला विरोध करणाऱ्या मायावतींनी ह्यावेळी तसे केले नाही. उलट 'हाथी नही, गणेश हैं. ब्रह्मा विष्णु महेश हैं.' अशी सर्वसमावेशक सश्रद्ध घोषणा दिली. त्यामुळे उप्रतील सामान्य जनतेला त्या आपलेसे करू शकल्या असे आपल्याला वाटते का?