उत्तरप्रदेश एक मोठे राज्य आहे. तेथे ८० खासदार व ४०३ आमदार आहेत. या दृष्टीकोणातून पाहिले तर हे १५% सांसद देशाचे राजकारण फिरवण्यास पुरेसे आहेत. परंतु, ते योग्य दिशेने फिरवतील या बद्दल खात्री नाही, किंबहुना फिरवू शकणार नाहित.

बसपा चा विजय  ब्राह्मण दलित सहमतीनेच, भाजप, सपा, काँग्रेस ह्यांच्या चुकांमुळे मुळे नव्हे. बसपाने चुका सुधारल्यामुळे असे म्हणता येईल. भाजप व काँग्रेसमध्ये पूर्ण साम्य आहे. दोन्ही पक्ष निवडून येण्याकरता मतदाराना अश्यक्य स्वप्न दाखवतात, अश्यक्य आश्वासने देतात व एकदा निवडणूक झाली की, सर्व विसरून जातात. लोकाना हे कळून चुकले आहे म्हणून त्यानी बसपाला संधि दिली. पुढच्या निवडणुकीत बसपाने कांही करुन दाखवले तरच तगुन राहील अन्यथा जनता बसपालाही बाहेरचा रस्ता दाखवेल. भाजपला हिंदुत्त्व, राममंदिर या पलिकडे कांही दिसत नाही. काँग्रेसला नेहरु-गांधी घराण्याच्या बाहेर सुद्धा भारत आहे हे माहितच नाही. ते सर्व निवडून येण्याकरता सोनिया गांधीकडे पाहतात. सोनिया गांधीकडे करतृत्व शून्य. न केलेल्या त्यागामुळे त्या गर्विष्ठ झाल्या आहेत. सपाने संधी मिळून फायदा करुन घेतला नाही. अशा परिस्थितीत बसपाने गणित हुशारीने मांडले व सोडवून दाखवले.

हो हे तिन्ही पक्ष उध्वस्त झाले आहेत. त्यांची संजीवनी म्हणजे बसपाच्या चुका. बसपाने शासन चालवतनॅ वास्तवाचे भान ठेवले व गणित चांगल्या प्रकारे सोडवले तर या तीनच काय कोठल्याही पक्षाला स्थान नाही.

हे संख्येचे गणित आहे. बसपा आपला उमेदवार राष्ट्रपती पदाकरता उभा करु शकणार नाही परंतु, त्याना पसंत असलेला उमेदवार निबडून येईल.

काँग्रेसची वाताहत झाल्याबद्दल वाईट वाटत नाही. सपा कांही आदर्श पक्षच काय, पक्ष म्हणण्याच्या लायकीचा नाही. परंतु, ज्या पक्षाने बाजपेई सारखा पंतप्रधान दिला त्या भाजपचा वैचारीक गोंधळ, न बदलण्याचा उद्दामपणा, निरुपयोगी गोष्टीबद्दल वाद, देशहिताबद्दल उदासिनता वगैरे पाहून वाईट वाटते. धर्म हा मानवाकरता आहे, मानव धर्माकरता नाही हे भाजपाने समजून घ्यावे. (येथे जादा माहितीकरता टिचकी मारा)या देशातील कम्युनिष्ट व इतर प्रादेशिक पक्षाना त्यांचे स्थान दाखवण्याकरता या दोन्ही पक्षांची आवश्यकता आहे. त्यानी काळाची पावले ओळखून स्वतःमध्ये सुधारणा करावी.