माझं मत
वास्तविक आपण सर्वजण लग्न का करतो...कारण ती एक शारिरीक, भावनिक आणि सर्वांत महत्त्वाचं सामजिक गरज आहे.
समाजस्वास्थ्य टिकवणे ही सुद्धा आपलीच जबाबदारी नाही का?
आपण "मातृभूमी" चित्रपट पाहिला आहे का?
जर समाज टिकवायचा आहे तर सुरुवात आपल्यापासून नको का?
जर मुलगी मुलाच्या घरी येते ही जर पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे (संदर्भ: नर हा मादीपेक्षा बलवान आणि सामर्थ्यवान आहे हे मानण्यामुळे) तर मुलीला लहानपणापासून कुठेतरी माहीत असणार की आपल्याला दुसऱ्याघरी जायचे आहे तर मग जुळवून घेणे या शब्दाचा अर्थ थोडातरी माहीत हवा ना?!
मुलगेही तडजोडीस तयार असतातच पण त्या बाजूने विचार कोण करतो?आई-सून या नात्यामधे सर्वांत जास्त गोची मुलाची होते.
आई-वडील ही काही वस्तू नव्हे की ज्याची गरज लागल्यावर उपयोग/आठवण व्हावी.
कोणते आई-वडील आपल्या मुलास सांगतील की आम्हाला वेगळं रहायचं नाहीये?किंवा तुमच्यामुळे आमच्यावर ही आफत आली आहे!
जर आपल्यामुळे (सासू-सून) मुलाच्या संसारात कालवाकालव होणार असेल तर कितीही त्रास झाला तरी आई-वडील मुलापर्यंत तो त्रास पोहोचू देतील का?
माझं वैयक्तिक मत तरी असं आहे की मार्गदर्शनाची गरज सर्वांनाच भासते̱. घरांघरांत वडिलधाऱ्या व्यक्ती असणं हे निकोप कुटुंबाचं लक्षण आहे. आणि मतभेद कोणात नसतांत हो?आपण बाहेर जुळवून घेतोच ना की समाजाविरुद्ध पोहायचं धाडस दाखवतो? मग आपल्याच घरात, आपल्याच आई-वडिलांवर ही "डांग-डींग" का?
एक भाग यातला असा आहे की हम-दो हमार-एक या उक्तिप्रमाणे मुलीच्या आइ-वडिलांची पण ती एकुलती एक असू शकते तेव्हा विश्वासात घेऊन तिनेही मुलाला सांगवयास हवे की तिच्याही आई-वडिलांची जबाबदारी मुलास घ्यावी लागेल.
जाता जाता, शेवटी हा ज्याचात्याचा वैयक्तिक प्रश्न आहे...सर्वे सुखिनः संतु...यातच साऱ्यांचे सुख, सौख्य, हित सामावले आहे!