प्रणवपंत,
शार्दूलविक्रीडित हे त्याच्या भारदस्त नावामुळे समरगीते गायचे वृत्त आहे असे उगाचच वाटते.  
त्यात गज़ल वगरे म्हणजे तलवारीने झबल्याची शिवण उसवण्यातला प्रकार झाला अशी माझी समजूत होती. पण ही गज़ल आवडली. ही इतरत्रही वाचण्याचा योग आला आहे. त्याबद्दल मी मागेच दिलेली प्रतिक्रिया पुन्हा एकदा देईन, की

घे तारांगण सूर्य चंद्र सगळे तू ज़ाग येताक्षणी
राहो तारण माझियाजवळ ही स्वप्नातली चांदणी

आणि

झाली भातुकली ज़ुनी, हरवले ते मित्र त्या मैत्रिणी
का मी आज़ पुन्हा उगीच बसलो मांडून ही खेळणी?
हे शेर विशेष आवडले.
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा... :D

हे शेर विशेष आवडले. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा... :D

--अदिती