लेख आवडला नाही, असे म्हणण्यापेक्षा सूर रुचला नाही.
हेच, मी बराचवेळ लेख नेहमीसारखा का वाटला नाही याचे कारण शोधत होते. नेहमीचा मनुष्य (humane) टच त्यात दिसला नाही, आपल्या लेखात इतरत्र दिसणारा हळुवारपणाही नाही. लेख "पुरुषाने" लिहिला, मनुष्याने नाही हे जाणवले.
काही वाक्ये निश्चितच खटकली. स्पष्टपणे लिहित आहे, राग मानू नये.
बाई मोठ्या रंगात आल्या होत्या.
म्हणजे नेमके काय? मी केलेल्या विमानप्रवासातही प्रत्येक हवाईसुंदरी बाटली अशीच धरते. अगदी कोक आणि इतर सोड्याचीही. तेव्हा बाई रंगात येते म्हणजे नेमके काय करते? ती तिला मिळणाऱ्या मोबदल्याला अनुसरून सेवा करत होती हेच ना?
मी बोलून गेलो, 'दरवाजाच काय, वेळ पडली तर..' मी पटकन जीभ चावली. ती मात्र चक्क लाजली आणि धूम पळाली.
हवाई सुंदरीसारखी कामे करणाऱ्या स्त्रिया अशा वाक्यांनी लाजून पळून जात असतील का, तेही त्या कंजस्टेड विमानात याबाबत साशंक आहे. तसेही हे वाक्य काही स्त्रियांना एखाद्या अनोळखी पुरुषाने म्हटलेले आवडणार नाही हे निश्चित.
अवांतर : फाकडू आणि छबकडी शब्दांत नेमका फरक काय?