लेख अर्धा वाचून सोडून दिला होता.. त्यामूळे 'दरवाजाचा किस्सा' वाचायचा राहूनच गेला...आता वाचल्यावर त्यातील गंभीरता लक्षात आली!..त्याचबरोबर स्मितसख्या,चंट बाहुल्या, लडिवाळ सेविका ही विशेषणे देखिल नक्किच खटकतात. महिला कर्मचाऱ्यांचा उल्लेख ही विशेषणे लावुन करण्यात कसला धाडसी विनोद आहे ते कळले नाही. .. त्यावर आलेला पहिला (महिला सभासदाचा)  प्रतिसाद "त्यातल्या त्यात किंगफिशरच्या छबकड्या अधिक सुबक सुंदर आणि सेवातत्पर असतात असे काही मित्रांकडून कळते" आणि त्याला "निव्वळ 'त्या' कारणास्तव किंगफिशरने प्रवास करावा असे आमचे काही गुलछबू मित्र सांगतात" हे उत्तर इथल्या कडक आणि काटेकोर प्रशासनातून कसे सुटले? ह्याचे आश्चर्य वाटते.