यात मला विसंगतीचा कसलाही भाग दिसत नाही.  सर्व सुसंगतच आहे.    आणि त्यात खिल्ली कसलीच उडवलेली नाही. 

जर काही आक्षेपार्ह असेल तर ते म्हणजे विमानातील सेविकांना वेगवेगळी विशेषणे बहाल करणे (उदा: मधुमक्षिका - नक्की कुठच्या फुलावरचा मध गोळा करायला ह्या विमानातून उडतात? ) आणि त्यांच्यावर टिपणी करणे. तरूण वयात तेही ठीक आहे , गंमतीने केले असे समजून सोडून देता येऊ शकते पण असे पुरुषांचे लक्ष त्या मुलींना /स्त्रियांना मनातून हवेसे वाटत असते असे समज असले तर ते दूर व्हायला पाहिजेत.  हेच जेव्हा कचेरीतील स्त्रियांशी  होते तेव्हा याला वेगळे रूप येऊ शकते आणि गंभीर असते हे लक्षात घेतले पाहिजे.   सर्वसाक्षींचे पूर्वीचे लिखाण लक्षात घेता त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती.