सोज्वळपणाचे मुखवटे धारण केलेल्या आविर्भावातले बरेवाईट प्रतिसाद वाचले.

दुसऱ्यांचे मुखवटे सोज्वळपणाचे दिसणे हा ही चष्म्यातून दिसणारा भाग होऊ शकतोच.

बाई मोठ्या रंगात आल्या होत्या

हे का वापरले आहे हे लेखकाने सांगावे, वाचकांना त्याबद्दल पूर्ण माहिती असावी असे वाटत नाही. बाई स्वतःचे कर्तव्य करताना रंगात आल्या होत्या, कलेची आराधना करताना नाही.

हे का वापरले आहे हे लेखकाने सांगावे, वाचकांना त्याबद्दल पूर्ण माहिती असावी असे वाटत नाही. बाई स्वतःचे कर्तव्य करताना रंगात आल्या होत्या, कलेची आराधना करताना नाही.
'दरवाजाच काय, वेळ पडली तर..' हेही तितकेच खेळकर उत्तर आहे. यावर लाजणे ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे.

ज्या बायकांना बऱ्याच गिऱ्हाईकांकडून हे ऐकू येते, हे मी माझ्या दोन-तीन मैत्रिणी ज्या फ्लाईट अटेंडंट आहेत त्यांच्या अनुभवावरून सांगत आहे त्या लाजत नाहीत, त्यांना सवय होते. बहुतेक दुर्दैवाने कोडग्या होतात कारण त्यांच्या नोकरीचा प्रश्न असतो.

लेख "पुरुषाने" लिहिला, मनुष्याने नाही हे जाणवले.

लेखाचा सूर जसा वाटला तसा लिहिला.

लेखाचा सूर जसा वाटला तसा लिहिला.

प्रशासक यांस:

माझ्या कोणत्याही प्रतिसादात लेखकाशिवाय इतर कोणत्याही वाचकाला उद्देशून काहीही लिहिलेले नसता मानसोपचारतज्ज्ञांची भेट घ्यावी. सोज्वळपणाचे मुखवटे धारण केलेले वगैरे सारखे आरोप का प्रसिद्ध केले आहेत याचे कारण कळेल काय? की काही प्रसिद्ध माणसांसाठी मनोगतावर वेगळे कायदे लागू होतात?