गज़ल आवडली. बऱ्याच शेरात  वृत्त सहजरित्या गज़लेत बसले आहे! मक्ता खूप आवडला.

माझे प्रश्न मलाच चार पडले-

हे सहज आले नाही, नेहमी बोलतो तसे शेरात बोलणे अपेक्षित असले तरी मलाच मधील 'च' चे काय स्पष्टीकरण देता येईल? तुमची तुम्ही उत्तरे दिली किंवा मी माझे उत्तर दिले अशाप्रकारचा अर्थ अपेक्षित असला तरी या शेराच्या रचनेत सहजता नाही, वृत्ताची बंधने !(तुमचे प्रश्न तुम्हालाच पडले ते बरे झाले! हलकेच घ्यावे)
चरण्याच्या शेरामधील 'ते' मधून काय सांगायचे आहे?असे अर्थ लावायचा तसा लावा अशा धाटणीचे शेर करण्याऐवजी नक्की एक दोन अर्थ निघतील असे शेर वाचायला आवडतील. आमच्या मते असे वाचकाने त्याच्या आकलन शक्तीला ताण देऊन वाचलेले शेर सशक्त नाहीत.
ती म्हटली मधील म्हटली तांदूळात खडा लागावा तसे लागले.

आता पुढील गज़म मंदाक्रांता ,शिखरिणी मध्येही लिहून पहा, आम्हाला वाचायला नक्की आवडेल.