सर्वांचे अभिप्रायाबद्दल आभार.

अनेकांना लेख आवडला अनेकांना खटकला, काहींना अश्लिलतेचा भास झाला. असो. प्रत्येकाचे मत आणि ते व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य याचा आदर राखून हे सर्व ठीक आहे.

मला कोणताही खुलासा द्यायचा नाही, विशेषत: मी पूर्णपणे निकोप व केवळ विनोदी लेख म्हणून सादर केलेले असताना. एक गोष्ट मात्र नक्कीच जाणवली. काही हरकतीचे मुद्दे हे एकांगी व नकारात्मक विचारातून उमटलेले आहेत. उदाहरणच द्यायचे तर 'मधुमक्षिका' या शब्दाला हरकत. माझ्या माहितीप्रमाणे मधमाशी हे कष्ट, सातत्य व चिकाटी याचे प्रतिक आहे. या अनुशंगात आधीची वाक्ये वाचल्यावर हा अर्थ सुस्पष्ट आहे. केवळ आकर्षक स्त्री हे प्रतित करायचा उद्देश असता तर मी पुलपाखरू हा शब्द वापरला असता. तीच गत 'बाई मोठ्या रंगात आल्या होत्या'हे खटकण्याची. कलाकाराने भूमिकेशी समरस होणे या अर्थी 'रंगात येणे' हा अत्यंत रूढ शब्दप्रयोग आहे. हा शब्द कलाकार तसेच खेळाडू यांच्या बाबतीत हमखास वापरला जातो. त्या वेळी ती सेवीका आपली भूमिका इतकी रममाण होउन निभावत होती की तीची समरसता पाहून सदर वाक्य आले.

अनेकांनी हा लेख समजुन अनेक हरकतींना समाधान कारक असे उत्तरही दिले आहे, त्या सर्वांचे विशेष आभार. तसेच व्य नि वा थेट संपर्काद्वारे ज्यांनी अभिप्राय कळविले त्या सर्वांचे आभार. ज्यांनी लेखन आवडले नाही असे लिहिले आहे त्यांचे आभार, त्यामुळे शैली/ संगती/ हाताळणी या पैकी काय कमी पडले आहे याचे चिंतन करणे होइल.