आपल्या खुलाशाबद्दल आभार.
काही हरकतीचे मुद्दे हे एकांगी व नकारात्मक विचारातून उमटलेले आहेत
कलाकार आणि नेमून देणारे काम करणारी सेविका यात मला अद्यापही फरक दिसतो परंतु मला दिसतो म्हणून तो इतरांना दिसावा असे नाही तेव्हा आपला मुद्दा मान्य. विचार एकांगी आणि नकारात्मक वाटले असल्यास क्षमस्व!
आता काही इतर एकांगी विचार:
अत्यानंद:
सदर वाक्य पु. लं. नि न म्हणता नटीच्या घरची लादी पुसणाऱ्या घरगड्याने म्हटले असते तर तिची काय प्रतिक्रिया झाली असती? लाजणे इ. नसावीच असे वाटते. वाक्य कोण उच्चारते याला महत्त्व असते.
साती:
हवाई सुंदरी हा शब्दच मुळी अनेकांना मान्य नसतो. हवाई सेविका ठीक वाटतो आणि अनेक देशांत तो तसाच वापरला जातो. प्लेजंट पर्सनॅलिटी आणि सौंदर्य यांचा फारसा संबंध नसावा असे वाटते. गिऱ्हाईकांशी सरळ संवाद साधणाऱ्या प्रत्येक सेवकात ते असणे अत्यावश्यक असते.
असो.
ज्यांनी लेखन आवडले नाही असे लिहिले आहे त्यांचे आभार, त्यामुळे शैली/ संगती/ हाताळणी या पैकी काय कमी पडले आहे याचे चिंतन करणे होइल.
या वाक्याबद्दल विशेष आभार. आपल्या प्रगल्भतेचे कौतुक वाटले.