अदितीताई, आपण आम्हाला समजेल असे स्पष्टीकरण दिले त्याबद्दल आभार. तुमच्या किंवा कवीच्या डोक्यात काय चालले आहे ते कसे काय समजायचे? कविता समजली नाही त्यात आपल्याला काय सूचित करायचे आहे ते समजले नाही आणि ते विचारले तर चिडता कशाला?अमका शब्द सगळ्यांना माहीत नसेल कदाचित म्हणून तो वापरायचाच नाही असं धोरण ठेवलं तर मला लेखन बंदच करावे लागेल जे मला कधीच करावंसं वाटणार नाही.
असे कुठे प्रतिसादात होते? प्रश्न विचारतांना जे समजले नाही ते विचारले. सर्व शंका जाहीरच विचारल्या आहेत, यापुढेही तसेच असेल. कुणी कमी लेखेल म्हणून प्रश्न न विचारता , कवितेची दखल न घेता पुढे जाणे कसे जमणार?  तुमचे अनुभव एक वाचक म्हणून आम्हाला अनुभवता आले नाहीत.

वैशाखातल्या नुसत्या कल्पना वाचूनच तुम्हाला भोवळ येत असेल तर तुम्ही बरोबर एक कांदा आणि कोलन वॉटरची एक बाटली घेऊनच यातायात करावी हे उत्तम! आणि हो. नागपुरात घालतात तशी पागोटी वापरल्यास उन्हाळ्याचा त्रास कमी होईल असे वाटते...
कमॉन जीजि.. यात तुम्हाला न समजण्यासारखं काही नाही हो! यू कॅन डू बेटर दॅन धिस!
हा हा! आपल्या माहितीकरता राज्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद नागपुरात होत नाही म्हणे!पण कांदा  जवळ जरूर बाळगू.
कविता लिहिताना तर्कबुद्धी जागृत ठेवावी तशी प्रश्न विचारतानाही ठेवावी नाही का?
जेवढी आहे तेवढी तर्कबुद्धी जागृतच होती हो!
आता कविता नीट समजली!.धन्यवाद