"काही हरकतीचे मुद्दे हे एकांगी व नकारात्मक विचारातून उमटलेले आहेत. उदाहरणच द्यायचे तर 'मधुमक्षिका' या शब्दाला हरकत.माझ्या माहितीप्रमाणे मधमाशी हे कष्ट, सातत्य व चिकाटी याचे प्रतिक आहे. या अनुशंगात आधीची वाक्ये वाचल्यावर हा अर्थ सुस्पष्ट आहे."

उत्तराबद्दल आभारी आहे. याला एकांगी विचार म्हणाल्यास ते कदाचित बरोबर आहे.  पण ते इतर लिखाणामुळे (जे चुकीचे वाटले) चुकीच्या दिशेने गेले.  नकारात्मक का म्हणालात कळले नाही.   

"ज्यांनी लेखन आवडले नाही असे लिहिले आहे त्यांचे आभार, त्यामुळे शैली/ संगती/ हाताळणी या पैकी काय कमी पडले आहे याचे चिंतन करणे होइल."

धन्यवाद.  आपण ह्याबद्दल विचार केला तरी खूप आहे.  तुमचे यापूर्वीचे लिखाण पाहता मी आधी म्हटले तसे लेखातले काही उल्लेख खटकले. 

पुढच्या लिखाणाला शुभेच्छा.

सुहासिनी