जीजि ताई,
महाराष्ट्रातच काय पण जगात सर्वाधिक तापमानाची नोंद सध्या तुमच्या डोक्यात होत असणार याची खात्री आहे. म्हणूनच तर पागोट्याखाली कांदा ठेवायला सांगितला ना!
कांद्यापेक्षा 'बेटर' काय ते मला माहीत नाही पण तुम्हाला ते चांगलं ठाऊक असणारच. माझ्या मते बेस्ट उपाय सुचवला हो!

त्यातून अज्ञानाला कोणी कमी लेखत नाही हो. पण शंका विचारताना नम्रपणे विचारावी असा संकेत आहे(निदान आम्हाला तरी असंच शिकवलंय). समोरच्याला अक्कल नाही असं मनात म्हणत शंका विचारायच्या प्रकाराला काय म्हणावं? वैशाखात येणारे हे अनुभव माझे एकटीचे नाहीत आणि जर तुम्ही आयुष्यभर टुंड्रा प्रदेशातच जन्मला आणि वाढला नसाल तर तुम्हाला त्यात अनोळखी काही नाही हो. 

जेवढी आहे तेवढी तर्कबुद्धी जागृतच होती हो!.  "जेवढी आहे तेवढी" हा उल्लेख आपण केलात. मी कोणाच्याच तर्कबुद्धीचे माप काढायला गेले नाही आणि जात नाही. पण तर्कबुद्धी कुठे आणि कशी वापरावी याचं तारतम्य ती वापरणाऱ्याने बाळगावं अशी अपेक्षा निश्चितच चूक नाही.

आपल्याला कविता समजली हे पाहून अतीव आनंद वाटला.
पुढील वाचनानुभवासाठी शुभेच्छा!
--अदिती