सोज्वळपणाचे मुखवटे धारण करावे लागतात असे नाही. सोज्वळ मने असू शकतात. हे आपला चष्मा काढून पाहिल्यास कळून येईल.
"अगदी'विरंगुळा' या शब्दापासून आक्षेपाला सुरुवात झाली आहे. लांबलचक कंटाळवाणा विमानप्रवास आणि अकारण सुतकी चेहरा धारण केलेले सहप्रवासी यात एखादा प्रसन्न (आणि हो, भिन्नलिंगी!) चेहरा आपल्याला जे देतो त्याला 'विरंगुळा' नाही म्हणायचे तर काय? " - नक्कीच असा चेहरा प्रसन्नता देऊ शकतो पण तो भिन्नलिंगीच असला पाहिजे असे नाही. शिवाय एक चेहरा ठीक आहे पण सर्व सेविकांकडे विरंग़ुळा म्हणून कसे बघता येऊ शकेल?
'पुरुषाचे लक्ष वेधून घेणे हे साजशृंगाराचे मूळ उद्दिष्ट आहे' - खरे आहे पण ते बऱ्याचदा आपल्याला भावलेल्या पुरुषाचे, जाणाऱ्या येणाऱ्या कोणत्याही पुरुषाचे नाही.
"'विमानातले पुरुष सेवक हा मला विरंगुळा वाटतो' असे सर्वसाक्षी यांनी लिहिले असते तर त्यावर काय प्रतिक्रिया आली असती? " त्यांनी तसे लिहीले नाही हे तुम्ही विसरला आहात.
"आपल्याला" हे मी लेखकाला उद्देशून म्हटले होते. त्याच्या लेखनाबद्दल त्याला जागरूक करण्याचा प्रयत्न होता.
"आकर्षक, सुंदर देहयष्टीचे पुरुष आसपास असणे हे स्त्रियांना आवडत नाही असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? आणि हे आवडणे म्हणजे केवळ आपल्याला त्यांच्याकडून शरीरसुख मिळावे अशा अपेक्षेनेच असते काय?" - स्त्रियांना आकर्षक, सुंदर देहयष्टीचे (कृपया तुम्ही येथे अनेकवचन वापरले आहे हे लक्षात घ्या) पुरुष आसपास असणे आवडते असे सुचवणे तुम्ही कोणत्या आधारावर करताय?
मला वाटते ही चर्चा विमानातल्या कर्मचारी स्त्रियांबद्दल जरा जास्तच कॅजुअली लिहील्याने सुरु झाली आहे. मी मला वाटले ते आधीही सांगितले आहे की अशा गोष्टी जर कचेरीतील स्त्रियांबद्दल बोलल्या गेल्या तर महागात पडू शकते. लेखाचा सूर आवडला नाही, किंवा एखादी गोष्ट आवडली नाही/ खटकली म्हणून सांगितल्यास त्याचा निदान विचार करणे हे सूज्ञपणाचे लक्षण आहे. ते सर्वसाक्षींनी केल्याने माझ्या दृष्टीने हा प्रश्न आधीच संपला आहे.
सुहासिनी