यूथ होस्टेलतर्फे मी सारपास ट्रेक केला आहे, त्यामुळे त्यांची शिस्त आणि तत्त्व मला माहिती आहेत आणि आवडतातही!
गेले दोन वर्ष माझी बहिण मला या गोव्याच्या ट्रेकला जाऊया असा आग्रह करतेय पण ते मला जमत नव्हतं, पण तुमचा लेख वाचल्यावर प्रथम बहिणीला मेल टाकून डिसेंबरचा हा ट्रेक नक्की करायचा हे लिहीलं आणि मग प्रतिसाद लिहायला घेतला.
फारच छान जमला आहे लेख. 'मनोगत' वर फोटो टाकता येतात का? (मी नवीन सभासद असल्याने मला कल्पना नाही) येत असतील तर तुम्हाला काही फोटो टाकायला जमेल का? तुमच्या लेखात उल्लेख आहे की तुम्ही अजून काही ट्रेक केले आहेत...त्यावरही लेख येऊद्यात...तुम्हाला लिहीणं फार छन जमलय!