मला आवडणाऱ्या गाण्यांपैकी पहिल्या दहात येणारे काव्य!

या कवितेतला "दिलमें खयाल आना" हा भाग फारच विचित्र आहे.
खयाल- विचार - नेहमी मनात येतो पण मूळ कवीने (साहिर) हृदयात येतो असे का म्हटले असावे?
की खयाल - हा विचार नसून जाणीव आहे? "कधी-कधी मम हृदयी ही जाणीव होते..." असे?
आणि "कधी-कधी" का? नेहमी का नाही?
"ठेव" हा शब्द तुम्ही अचूक वापरलाय- मर्मबंधातली ठेव असा!

"मगर यूंही" = पण उगाच.

आणि ...

ऊठेगी मेरी तरफ प्यार की नजर यूंही
मैं जानता हूं के तू गैर है मगर यूंही
कभी कभी मेरे दिलमें खयाल आता है - या सर्वोच्च ओळी राहूनच गेल्या की!

त्यांच्याशिवाय या कवितेला कांहीच अर्थ नाही.
हे एक विरहगीत आहे हे कळणारच नाही. 
- या दोन ओळींमुळे मग 'कधी-कधी' चा अर्थ कळतो. 'पण उगाच' चा अर्थ कळतो. 'हृदयातल्या जाणिवे'चा अर्थ कळतो.

मजवर प्रेमळ कटाक्ष पडेलही पण उगाच
मी जाणतो तू परकी आहेस पण उगाच
-म्हणजे एकतर हे प्रेम एकतर्फी आहे आणि कदाचित ती आता दुसऱ्याची आहे... 
फारच सुंदर काव्य!

आणि कभी-कभी मधली दुसरी कविता... अमिताभच्या धीर गंभीर आवाजात-
"मगर ये हो न सका और अब ये आलम है
की तू नही, तेरा गम - तेरी जुस्तजू भी नही"
ही त्याही पुढची भावना... क्या बात है!

अवांतर : माझ्या आतेभावाकडे अमिताभची स्वाक्षरी असलेली कभी-कभीची मूळ तबकडी आहे. अमिताभने स्वतः माझ्या आत्याच्या घरी येऊन ती भेट दिली होती. १९७५ साली तबकड्या चकाकत नसत - डांबरासारख्या काळ्याकुट्ट असत. आणि १९७५चा अमिताभही आतासारखा चकाकत नव्हता - पण काळाकुट्ट नव्हता हेही खरे. :):)