मा. सुहासिनीबाइ,

आपला गैरसमज झालेला असावा.

आपण लिहिले आहेत <<मला वाटते ही चर्चा विमानातल्या कर्मचारी स्त्रियांबद्दल जरा जास्तच कॅजुअली लिहील्याने सुरु झाली आहे.  मी मला वाटले ते आधीही सांगितले आहे की अशा गोष्टी जर कचेरीतील स्त्रियांबद्दल बोलल्या गेल्या तर महागात पडू शकते.  लेखाचा सूर आवडला नाही, किंवा एखादी गोष्ट आवडली नाही/ खटकली म्हणून सांगितल्यास त्याचा निदान विचार करणे हे सूज्ञपणाचे लक्षण आहे.  ते सर्वसाक्षींनी केल्याने माझ्या दृष्टीने हा प्रश्न आधीच संपला आहे. >>

मी चार शब्द व्यक्त केले ते असे की <<"ज्यांनी लेखन आवडले नाही असे लिहिले आहे त्यांचे आभार, त्यामुळे शैली/ संगती/ हाताळणी या पैकी काय कमी पडले आहे याचे चिंतन करणे होइल.">>

मी लेखन व त्याचे साहित्यमूल्य या विषयी या विषयी लिहिले आहे. माझ्या लेखनाचा विषय वा आशय चुकीचा आहे असे मी कुठेही म्हटलेले नाही. मुळात दूषीत पूर्वग्रह न ठेवता लेख नीट वाचला तर लेखात या व्यवसायाचे कौतुकच केलेले दिसेल. 'कॅज्युअली लिहिल्याने' म्हणजे काय ते कृपया स्पष्ट करा. 'अशा गोष्टी कचेरीतील स्त्रीयांबद्दल.....' यात अशा गोष्टी म्हणजे काय ते जरा स्पष्ट आणि सविस्तर सांगा. आपण असा अरोप केलाच आहात तर माझे 'कचेरीतील वावरात अनैतिक, अश्लिल, वा वावगे व स्त्रीयांना लाज वाटावे/ दु:ख व्हावे असे कोणते उद्गार वा वाक्ये या लेखात आहेत ते दाखवून द्या. कचेरीतीलच काय, कोणत्याही महिलेला गमतिशीर प्रश्न/ टिपणी व वाह्यातपणा यातील फरक उत्तम समजतो!

माझ्या कुण्या सहकारीणीला जेव्हा कामानिमित्त उशिरापर्यंत थांबावे लागलेले असते आणि तेव्हा मीही कचेरीतच असलो, तर मी तिला घरपर्यंत सोडतो. जाताना ती आपल्या घरी दूरधवनीवरून सहजगत्या सांगते, 'मी आता कचेरीतून निघत आहे, माझे सहकारी बरोबर आहेत, काळजी करू नका'. आणि यात तिला, तिच्या पतीला वा तिच्या सासूबाईंना/ आई-बाबांना काही गैर वाटत नाही. 

कारण जे विष आपल्या मनात आहे ते ते तिच्या, तिच्या कुटुंबियांच्या वा माझ्या मनात नसते.

असो. बाकी मी, माझे सहकारी/ सहकारीणी, मित्र/ मैत्रीणी इतर परिचीत व आमचे परस्परांशी वर्तन/ संभाषण तसेच कचेरीतील / देशा-परदेशातील सहव्यावसयिकांच्या कचेरीतील स्त्रीयांच्या मानसातील माझी प्रतिमा याविषयक अधिक तपशिल देण्याची गरज मला वाटत नाही.