पिंपरी, ता. १६ - विषबाधेतून मृत्यू अशी नोंद झालेल्या उदीत अश्विनीकुमार भारती (वय २४) या तरुणाचा प्रत्यक्षात प्रसादातून विष खायला देऊन खून झाल्याचे काल उघडकीस आले. प्रेमातील अडसर दूर करण्यासाठी मित्र-मैत्रिणीनेच हा विषप्रयोग केल्याचे स्पष्ट झाले आहे. ........
आदिती वसुदेव शर्मा (वय २४, रा. सैनिक कॉलनी, जम्मू रेल्वे स्थानकाजवळ) आणि प्रवीण प्रेमस्वरूप खंडेलवाल (वय २४, रा. जयपूर) या दोघांना हिंजवडी पोलिसांनी काल रात्री अटक केली. त्यांना येत्या ता. १९ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश पिंपरी न्यायालयाने दिले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील आयआयएम महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या उदीत याचा २३ एप्रिलला अन्नातून विषबाधा झाल्याने चिंचवडमध्ये मृत्यू झाला. मात्र उदीतचा खून झाला असल्याचा संशय व्यक्त करून त्याचे वडील अश्विनीकुमार जगन्नाथ भारती (वय ५८) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार हिंजवडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र भामरे यांनी आदिती आणि प्रवीण यांना चौकशीसाठी जम्मूहून येथे बोलावले. दरम्यान, उदीत याने त्या दिवशी खाल्लेल्या अन्नाच्या रासायनिक तपासणीच्या अहवालात, त्याच्या पोटात आर्सेनिक नावाचे विष गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लगेचच दोघांना अटक करण्यात आली.
उदीत आणि आदिती हे जम्मू येथे महंतसिंग इंजिनिअरिंग महाविद्यालयात एकाच वर्गात असल्यापासून त्यांचे प्रेमप्रकरण होते. ते त्यांच्या घरच्यांनाही माहीत होते. त्यानंतर ते वाकड येथील आयआयएम महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण घेत होते. तेथेच प्रवीणही शिकत होता. एकाच महाविद्यालयामध्ये असल्याने आदिती आणि प्रवीणची ओळख झाली. त्यांचे संबंध वाढल्याने उदीतशी आपले संबंध नसल्याचे आदिती सांगू लागली. त्यांच्या प्रेमप्रकरणात उदीतचा अडसर निर्माण झाल्याने त्याने आपल्यात कोणतीही मध्यस्थी करू नये, असा दम दोघांनी उदीतला दिला होता. त्यानंतर गेल्या ता. २२ एप्रिल रोजी दोघांनी त्याला चिंचवड येथील "मॅकडोनाल्ड' हॉटेलमध्ये बोलावले. तेथे साईबाबांचा प्रसाद दिला व त्यानंतर ते निघून गेले. त्यानंतर उदीतला उलट्या व जुलाब सुरू होऊन, प्रकृती गंभीर झाल्याने मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.
संशयावरून, आदिती आणि प्रवीण यांना चौकशीसाठी येथे बोलावण्यात आल्यावर उदीतने खाल्लेल्या अन्नात विष आढळल्याने दोघांना अटक करण्यात आली. पिंपरी न्यायालयात न्या. अश्विनी गुजर यांनी या दोघांना १९ मेपर्यंत पोलिस कोठडी दिली.
आता नक्की सांगा प्रेम म्हणजे काय ? व किती वेळा बदलता येते ते ???
याचा अर्थ असा नक्की नाही कि प्रेम करु नका , जरा डोळस,समंजस करा....