नामदेवराव,
आपला प्रतिसाद वाचून सखेद आश्चर्य वाटले! हुतात्म्यांविषयीचे कृतज्ञ लेखन आणि एक विनोदी लेख यांची ही अनाठायी गल्लत कशासाठी?
<वास्तवीक लेखाची कल्पना आवडली पण बायकांबद्दल लिहाताना वापरलेले बरेचसे शब्द अनुचीत वाटले>
यातील बायका कोण? मी केवळ विमानातील सेविकांविषयी लेख लिहिला आहे त्याचे समस्त स्त्रीजातीवर सामान्यीकरण करण्याचा हा आगलावेपणा कशासाठी?
छबकडी, बाहुली, ठकी, परी हे सर्व शब्द घराघरातुन गोड दिसणाऱ्या मुलींना उद्देशून वापरले जातात, साहित्यातही हे शब्द वैपुल्याने वापरले गेले आहेत. यापैकी अनुचित कोणते? आणि कसे? लेख हा विमान सेविकांचे रुप वर्णन करण्यासाठी नसून एकुण त्यांची एकूण कार्यपद्धती व रटाळ प्रवास सुसह्य होण्यात त्याचा वाटा असा आहे. त्यांची कार्यक्षमता, त्यांची कार्यनिष्ठा या विषयी जे लीहिले आहे ते आपण वाचलेले दिसत नाही!
संपूर्ण गीत वाचून दाद द्यायची की एकच ओळ वाचुन अश्लिलतेचा गदारोळ माजवायचा हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. जशी दृष्टी तशी सृष्टी!
असो. बाकी समर्थकांना झोडपताना आपण ज्यांनी गलिच्छ शब्द वापरून/ अनाठायी वा चुकिचा विरोध केला आहे त्याच्याकडे आपण सोयिस्कर काणाडोळा केला आहेत.
सर्वात उद्वेगजनक गोष्ट म्हणजे आपली क्लुप्ती.<मुलींकडे बघत बसणे काय किंवा मुंबईच्या लोकल्समधे "महीलांच्या बाजूच्या डब्यात उभे राहून काही न बोलता (कॉमेंट न करता), वखवखलेल्या फक्त नजरेच्या स्पर्शाने बघितले म्हणून काय, ते काही बाकीचे स्पर्श झाले नाहीत म्हणून कमी होत नाही...त्यात उभ्या असलेल्या बायकांवर जर कोणी अशा प्रकारचा लेख लिहीला तर तो योग्य ठरेल का> वा रे वा! अहो अशा कल्पना देउन दुसऱ्या कुणाला प्रवृत्त करण्यापेक्षा स्वतः लिहा की. हे बरे आहे. कुणी चिथावणीला बळी पडून लिहिलेच तर बदनाम तो होइल, इकडे आपला आंबटशौक पुरा होइल वर निषेध दर्शवून आपण आपले सात्त्विक व्यक्तिमत्त्व ही उजळवून घ्याल. यावर उगाच लंगडे समर्थन देउ नका. आपण केवळ 'कुणी नको त्या विषयावर अश्लिल लेखन करेल तर?' असे म्हणून थांबू शकला असतात व तेच उचीत होते.
मी 'संपूर्ण गीत वाचून....' हे लिहिताना प्रत्यक्ष ओळी लिहिलेल्या नाहीत. अहो अर्थाचा अनर्थ सहज करता येतो. पण एका प्रासादिक रचनेतला वाह्यात अर्थ ज्यांना कल्पनाही नाही अशांना मुद्दाम का लक्षात आणून द्या? आपले नाव गाजण्यासाठी उगाच दुसऱ्याला बदनाम करायचा प्रयत्न बरा नाही.
नामदेवराव, तुम्ही इकडे या आणि राजकारणात सक्रिय व्हा, बघता बघता धुरंधर नेते म्हणून नाव काढाल