सर्वसाक्षी, एक लक्षात आणून देऊ इच्छिते - संजोप रावांना त्यांनी मला विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी लिहीलेल्या प्रतिसादाला तुम्ही उत्तर देत आहात.  परंतु प्रश्न मला विचारले गेले आहेत त्यामुळे त्याची उत्तरे देणार आहे. 

"माझ्या लेखनाचा विषय वा आशय चुकीचा आहे असे मी कुठेही म्हटलेले नाही. " - मी ही म्हटले नाही.  आपल्या "ज्यांनी लेखन आवडले नाही असे लिहिले आहे त्यांचे आभार, त्यामुळे शैली/ संगती/ हाताळणी या पैकी काय कमी पडले आहे याचे चिंतन करणे होइल" या वाक्यावरूनच हे लिहीले आहे त्याविषयी गैरसमज होण्याची गरज नव्हती. 

"'कॅज्युअली लिहिल्याने' म्हणजे काय ते कृपया स्पष्ट करा."  - माझ्या दृष्टीने जास्त विचार न करता (अविचाराने अश्या अर्थाने नाही) लिहीले गेलेले काहीही. 

"'अशा गोष्टी कचेरीतील स्त्रीयांबद्दल.....' यात अशा गोष्टी म्हणजे काय ते जरा स्पष्ट आणि सविस्तर सांगा. आपण असा अरोप केलाच आहात तर माझे 'कचेरीतील वावरात अनैतिक, अश्लिल, वा वावगे व स्त्रीयांना लाज वाटावे/ दु:ख व्हावे असे कोणते उद्गार वा वाक्ये या लेखात आहेत ते दाखवून द्या. कचेरीतीलच काय, कोणत्याही महिलेला गमतिशीर प्रश्न/ टिपणी व वाह्यातपणा यातील फरक उत्तम समजतो! बाकी मी, माझे सहकारी/ सहकारीणी, मित्र/ मैत्रीणी इतर परिचीत व आमचे परस्परांशी वर्तन/ संभाषण तसेच कचेरीतील / देशा-परदेशातील सहव्यावसयिकांच्या कचेरीतील स्त्रीयांच्या मानसातील माझी प्रतिमा याविषयक अधिक तपशिल देण्याची गरज मला वाटत नाही. "

सर्वसाक्षी, तुमच्यावर मी व्यक्तीगत कसलाही आरोप केला नाही - तुम्ही स्वत:चे व्यक्तिगत जीवन त्यात आणून उगाच वाद वाढवत आहात.   तुम्ही कचेरीत, घरात किंवा दारात कसे वागता हे मी बघायला आले नाही आणि ते तुमचे व्यक्तीगत खाजगी जीवन आहे त्याच्याशी मला कर्तव्य नाही.  तुमचे खरे नावही मला माहीती नाही , तुमच्या कचेरीतील स्त्रिया माहिती नाहीत, त्यांचे कुटुंबीय माहिती नाहीत, आणि माहिती करून घ्यायचे नाहीत.  तुमचे तपशील तुमच्याकडेच ठेवा, ते जाणून घ्यायची अजिबात इच्छा नाही.  राहता राहिला कचेरीतील स्त्रियांचा प्रश्न - (तुमच्या कचेरीतील नव्हे कारण मी जो आरोप तुमच्यावर केला नाही त्याबद्दल मला काही बोलायचे नाही)- विमान हा त्यातल्या प्रवाशांच्या दृष्टीने कचेरीबाहेर असणे असते, तेथे काम करणाऱ्या बायकांसाठी ते कामाचे ठिकाण असते.  आत्ताच्या काळात कचेरीत काम करताना अनेकदा साध्या वाक्यांचे अर्थ हे सेक्शुअल डिस्क्रिमिनेशन केल्याप्रमाणे लावले जाऊ शकतात त्याची माहिती अनेकदा दिली जाते त्यासंबंधी हा उल्लेख होता.  याचा अर्थ तुम्ही असे काही केले असे दुरूनही सुचवायचे नाही (आणि हो, हे संजोपराव म्हणतात तसे सोज्ज्वळपणाचा मुखवटा घालूनही म्हणत नाही आहे).   फक्त स्त्रियांना वेगवेगळी विशेषणे लावणे ( कितीही गंमतीने/ निरागसपणे  असतील) याला माझा विरोध आहे - त्या तेथे काम करीत असतात.  त्या कितीही गोड वाटल्या तरी त्यांना त्या गोड आहेत असे कचेरीत सांगणे  म्हणजे धारिष्ट्याचे होईल एवढेच सुचवण्याचा हेतू होता.  त्याचा एवढा विपर्यास केल्याचे पाहून अत्यंत वाईट वाटले.

"कारण जे विष आपल्या मनात आहे ते ते तिच्या, तिच्या कुटुंबियांच्या वा माझ्या मनात नसते."  - माझ्या मनात विष आहे असे सुचवणे, ही अत्यंत गंभीर आणि व्यक्तीगत स्वरूपाची टिपणी आहे.   माझ्याबद्दल काहीही माहिती नसताना तुम्ही माझ्यावर अत्यंत वैयक्तिक टिपणी करत आहात.   मी तुमच्या स्वत:च्या कचेरीचा विषयही कोठे आणला नसताना, तसेच तुमच्यावर/ तुमच्या चारित्र्यावर कसलेही व्यक्तिगत आरोप केले नसताना किंवा तसे सुचवलेलेही नसताना, तुम्ही  अतिशय चुकीच्या मार्गाने संभाषण वळवत आहात हे तुमच्या नजरेला आणून देऊ इच्छिते.  

सुहासिनी