जयंतराव,
आपण भाग्यवान आहात. कायदे-कानू सरकारी भानगडी यामुळे कुणी मदत करायला सरसावत नाही हे आहेच पण चिंतेची बाब म्हणजे हल्ली माणसे फार स्वार्थी व आत्मकेंद्री झाली आहेत. संवेदनाशिलता 'स्वांतसुखाय' जीवनाच्या ध्यासापुढे गोठत चालली आहे. अनेकदा संताप आणणारे दृश्य बघावे लागते - रूग्णवाहिका जीवाच्या आकांताने कर्णा वाजवीत गर्दीत वाट शोधत असते आणि पुढची वाहने त्याची दखलही घ्यायला तयार नसतात. म्हणजे रूग्ण दगावला तरी पर्वा नाही पण मला उधीर व्हायला नको.
आपण भाग्यवान आहात, आपल्या मुलीला संकटप्रसंगी सज्जन व क्रियाशील माणसे भेटली. अजूनही अशी मांणसे आहेत म्हणून गाडा चालला आहे.