पुस्तकाबद्दल माहिती दिल्याबद्दल चौकस व प्रदीपरावांचे आभार.

उमा कुळकर्णी यांनी भाषांतरित (की अनुवादित) केलेल्या के. शिवराम कारंथ, पूर्णचंद्र तेजस्वी, एस.एल.भैरप्पा, कर्नाड यांच्या पुस्तकांमुळे खरं तर कन्नड साहित्याची ओळख झाली. मराठी लेखकांपेक्षा किती वेगळे आणि भव्य विषय कन्नड साहित्यिक हाताळतात हे कळले.

स्वतः उमाताईंना कन्नड वाचता येत नाही मात्र बोललेले चांगले समजते! त्यांचे पती विरुपाक्ष हे बेळगांवचे व त्यांची कन्नड ही मातृभाषा. अनुवाद करताना विरुपाक्ष उमाताईंना पुस्तकातील उतारे वाचून दाखवतात व त्याचे भाषांतर उमाताई मराठीत करतात असे कुठेसे वाचले आहे. त्यामुळे उमाताईंच्या अनुवादामध्ये पुस्तकीपणा टाळला जातो व संवादाचे स्वरुप लेखनाला येते.