छानच आहे लेख ! (मी मात्र बिनधास्त "खुसखुशीत" म्हणेन !)
माझ्यासारखीच तुमच्या डोक्यात "खुळं" येतात का? मला तर हमखास अशी खुळं पछाडतात.
हो, तर काय ! यादीच सादर करावी लागेल....
घरातला बगीचा, मासे पाळणे, आमच्या गृहसंकुलाची कामे चकटफू करून देणे, पावसाळ्यात गर्दी कमी म्हणून तलावावर पोहायला जाणे, योगासने/व्यायाम/चालणे/टेबलटेनीस परत परत सुरू करून बंद करणे, घरच्या देवपूजेची जबाबदारी अधून मधून स्वतःकडे घेणे व सोडणे, लायब्ररीत जाऊन गेल्या ५/७ महिन्यांची फी एकदम भरून सदस्यत्व परत सुरु करणे, आंबे आणून विकणे व त्यात नुकसान पदरी पाडून घेणे, मध्येच एखादा संकल्प धरणे व तो सोडून पुन्हा धरून परत सोडणे......
वगैरे वगैरे सध्या इतकीच "खुळं" आठवतात.