मराठी लेखकांपेक्षा किती वेगळे आणि भव्य विषय कन्नड साहित्यिक हाताळतात हे कळले.

नुसते साहित्यच नव्हे, तर संगीत, चित्रपट अशा बाबतीतही ही मंडळी आपल्यापुढे आहेत. तीच गोष्ट बंगालीची. काही वर्षांपूर्वी आमच्या येथील भारतीय कौन्सुलेटने (मराठी प्र. श. मा./आ. ना.) उत्साहाने भारतीय चित्रपटमहोत्सव घडवून आणला होता. त्यात बंगाली चित्रपट होता अपर्णा सेनचा 'परोमितर एक दिन' हा नितांत सुंदर चित्रपट, कन्नड: गिरिश कासारवल्लींचा 'थाईसाहेब'. आणि आपला मराठी चित्रपट होता महेश मांजरेकरांचा 'अस्तित्व' हा अत्यंत सुमार चित्रपट! असो, हे विषयांतर झाले.