शुध्दतेचा आग्रह अनाठायी राहील असे वाटते. अहो, जेथे शिक्षकच अशुध्द लिहतात / बोलतात तेथे मुलांनी तरी कोणाचा आदर्श धरावा ?
त्यामुळे आहे त्या परीस्थितीत मराठी वाचवण्याचा ध्यास घ्यायला हवा असे मला वाटते.
द्वारकानाथ
द्वारकानाथ,
शुद्धतेचा आग्रह अनाठायी कसा राहिल ?? आणि "आहे त्या परिस्थितीत मराठी वाचवण्याचा ध्यास" तरी का घ्यायला हवा? आपल्याला अपेक्षित असलेली मराठी कोणती मग?? जी वाचवण्याचा ध्यास आपण घेणार आहात?
शिक्षक अशुद्ध लिहितात / बोलतात हा मुलांचा दोष आहे का? मग असे अशुद्ध बोलणारे / लिहिणारे शिक्षक घेतातच का शिक्षणसंस्था शिक्षक ह्या पदासाठी? मुळात शिक्षकी पेशा हा कुठेच नोकरी मिळाली नाही तर स्विकारणारे उमेदवार आहेत भरपूर तर भावी पिढी घडविण्याचे एक साधन म्हणून पाहणारे फार कमी! आमच्याच शाळेत आम्ही विद्यार्थी म्हणून असतांना शिकविणारे शिक्षक आणि आता त्याच शाळेत आलेले नवीन शिक्षक यांच्यातील तफावत पटकन नजरेत भरते.
पेशा म्हणून न स्विकारता केवळ उपजिविकेचे एक साधन म्हणूनच शिक्षकाची नोकरी करणारे उमेदवार शाळेत घेतले की मग हताश होवून मराठीची आणि भावी पिढीची वाताहातच आपण पाहायची का?
भाषेत बदल, सुधारणा आवश्यक आहेत. सोयीसाठी आणि सुलभतेसाठी ते स्विकारणे हा एक भाग झाला. पण आळशीपणा, कामचुकारपणा ह्यामुळे होणारी गळचेपी सहन करणे हा गुन्हा आहे असे नाही का वाटत?