तो म्हणाला की मी कधी गतिअनुकूलअक बदलतो का दुचाकी चालवताना. मी म्हटलं की मी कष्ट नको चालवताना म्हणून आधीच सर्वाधिक खालच्या गतिअनुकूलकामधे टाकून ठेवलेय. तो म्हणाला मूर्खा हा सगळ्यात खालचा नव्हे, सगळ्यात वरचा आहे, दुचाकी चढ चढेलच कशी?
छान! लेख आवडला. कंसातल्या विंग्रजीसह लेखातील मुद्दाम लिहिलेले अपरिचित मराठी प्रतिशब्द पाहून प्रतिशब्दांचा अट्टाहास का असा विचारला डोकावला. अर्थवाही प्रतिशब्द आणि परिचित प्रतिशब्द यांची योग्य निवड जरा कठीणच असावी.