'वास्तुशास्त्र' या विषयी मिळणाऱ्या माहितीला शास्त्र म्हणायचे की नाही हा एक वादग्रस्त मुद्दा असू शकतो. त्याला कदाचित एक प्राचीन पद्धती असे म्हणता येईल.ज्योतिषशास्त्राविषयी घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांसारखे काही आक्षेप इथेही लागू होऊ शकतात. मात्र मनोगतींना केवळ माहिती म्हणून काही गोष्टी सांगते आहे. वैदिक साहित्याचा धांडोळा घेतला तर घर, यज्ञशाळा इ. बांधण्यासाठीचे विविध नियम सापडतात. सध्या प्रचलित असलेल्या वास्तुशास्त्राचे पूर्वसूरी म्हणून या ग्रंथांकडे पहाता येईल. त्यातही ' गृह्यसूत्र' नावाच्या ग्रंथांमध्ये याविषयी सविस्तर माहिती मिळते.