माझ्या माहितीतले एक गृहस्थ 'वास्तुशास्त्र' या विषयावर वर्ग चालवतात ते खाजगीत सांगतात. की हे शास्त्र वगैरे काही नाही. लोकांना वेद पुराणाचा आधार सांगून काहीतरी ओबडधोबड सांगितले तर लोक खरे तर मूर्ख लोक हवे तेव्हडे पैसे देतात. आणि तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर काय हरकत आहे तसे करायला.
मला, दक्षिण दिशेला घराचा दरवाजा उघडत असेल तर काय आपत्ती येऊ शकते. असे दरवाजे किती लोकाचे आहेत, आणि त्यांना काय काय अडचणी आल्या याचा आढावा घेऊन सप्रमाण कोणी सिद्ध करून देईल का ?
दक्षिण दिशेला रावणाचे राज्य होते म्हणून ? की आणखी काही कारण आहे ?