.........जगण्याचे एव्हढे उघडे वाघडे चित्रण आपल्याला झेपेल का अशी शंका येऊ लागली आहे.

बजूवहिनींचा उल्लेख म्हणता होय? तो एकदाच ओझरता आला आहे. आणि जे वास्तव आहे, ते आहे, त्याला भिडून वाचण्यात भीति कसली? ह्या निमित्ताने तत्कालीन सामाजिक मूल्ये काय होती, त्याची एक झलक आपल्याला बघायला मिळते. पण केतकरवहिनींना स्वतःला ह्या असल्या गोष्टींचा जाच झाला नाही. त्यांना जर खरोखरीच आत्यंतिक त्रास कसला झाला असेल तर तो खास कोंकणी तिरकस वागण्याच्या पद्धतिचा. म्हणजे त्यांचे विशिष्ट कुळांबरोबर खटले चालणार, पण तसे ते चालू असतांना ती कुळे वहिनींकडे कसलीकसली मदत सहजपणे मागायला येणार-- कुणी घरात आजारी आहे, लोणचे द्या, काही नड आहे, पैसे द्या वगैरे. हेही ठीकच आहे, पण अश्या प्रकारे येवून गप्पा करतांना ही मंडळी हळूच खटल्याच्या संबंधाने काही उलटसुलट माहिती मिळते का हे बघणार. एक विशीष्ट हकिकत ह्याहून तापदायक आहे, जिथे वहिनींना सावकारी करण्यावरून गोवण्याचा अशाच तऱ्हेने प्रयत्न केला गेला.

ह्या सर्वांतून त्या निभावून गेल्या, एव्हढेच नव्हे तर त्याबद्दल त्यांना कसलीही कटूता नाही. खरोखरी वाचण्यासारखे पुस्तक आहे.