दंतकर्मी,
भाषा ही आपण समजतो त्याही पेक्षा जास्त प्रवाही असणारी गोष्ट आहे. त्यामुळे आवडो अथवा नावडो भाषा ही बदलत जाणार. बोलणार्या लोकांच्या सोयीने व्याकरण आणि लिखीत असणारी लिपी येत जाणार.
मुद्दा अजुन समजुन घेण्यासाठी एकाच काळातील रामदासांची मराठी, तुकारामांची मराठी आणि शिवरायांनी वापरलेली फार्सीचा प्रभाव असलेली मराठी या लक्षणीय पणे बदलतात.
याच अनुरोधाने जर सावरकरांनी भाषाशुध्दीचा आग्रह धरला नसता तर आपण जी शुध्द म्हणुन समजतो तीही मराठी राहीली नसती.
अग्रानुक्रमे त्यामुळे भाषेचा प्रवाह राहणे मुख्य आहे, शुध्दाशुध्दता दुय्यम आहे.
इंग्रजीचा लोंढा पाहिला तर मराठी जगणे महत्वाचे आहे बाकी नंतर पाहु.
द्वारकानाथ