अष्टाक्षरीतील कविता छानछान. विशेषत: ६ आणि ७. प्रेमात पडल्यासारखी वाटते शब्दांच्या. 'सुंदर', 'चांगले' शब्द योजिले म्हणजे कविता सुंदर, चांगली होत नसते. 'त्या' वैशाखाचे चांगले 'स्थिर' चित्र. अक्षरगणातल्या किंवा मात्रावृत्तातल्या कवितांपेक्षा अशा अष्टाक्षऱ्या टपाटप पाडणे. विशेषत: कवयित्रींमध्ये ह्या अष्टाक्षऱ्या लोकप्रिय आहेत. पण उत्तम अष्टाक्षरी लिहिणे कठीण आहे.
अवांतर: कवितेत २ अधिक २ म्हणजे ५ नसते. पण कवयित्रीने दिलेले स्पष्टीकरणही गणितीयच वाटते आहे. असो. वैशाखात तापणे साहजिक आहे.