अंधश्रद्धा" या विषयावर नरेंद्र दाभोळकर नेहमी तुटून पडतात. पण "वास्तूशास्त्र" या विषयावर ते काहीच का बोलत नाही. ? "वास्तूशास्त्र" ही "अंधश्रद्धा" च आहे.

असेल कदाचित. पण 'अंधश्रद्धा..... निपटून टाका' म्हणताना काही गोष्टींचे तारतम्य बाळगले पाहिजे. एखाद्या अशा 'अंधश्रद्धा' अशा ठरवलेल्या बाबीमुळे कुणाचेही वैयक्तिक अथवा सर्व समाजाचेच कशाही प्रकारे नुकसान होण्याची भीती आहे का? कुणी आजारी पडल्यावर निव्वळ अंगारे, धूपारे करणे ही बा अशी आहे, पण घर बांधताना अथवा अपार्टमेंट खरेदी करताना जर कुणी 'दार उत्तरेकडे असावे का दक्षिणेकडे' अशा बाबींचा विचार केला तर त्याने कुणाचे वैयक्तिकरीत्या अथवा समाजाचेही काहीही बिघडत नाही. दुसरे असे की धकाधकिच्या आयुष्यात मानवाला कसली ना कसलीतरी श्रद्धा आवश्यक आहे. जोपर्यंत ती वैयक्तिक अथवा सामाजिक विकासाच्या आड येत नाही, तोपर्यंत तिच्यावर 'अंधश्रद्धा' म्हणून तुटून पडण्याची जरूरी नाही.

ह्यापेक्षा अं. नि. समितीला बरेच काही करता येईल: उदा. कॅथॉलिक धर्मात संततिनियमनाचे कसलेही साधन वापरणे निषिद्ध समजले जाते. ह्यामुळे एच. आय. व्ही. सहजपणे पसरू शकतो. वैयक्तिक व समाजाच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत गंभीर बाब आहे. अं. श्र. सं. ने अशी कामे हाती घेतलेली बरे.