ज्योतिष्यशास्त्रामध्ये ज्योतिष्यगणित व फ़लज्योतिष्य असे दोन भाग आहेत.ज्योतिष्यगणित हे

ग्रहांचे गणित असून शास्त्रीय आहे तर फ़लज्योतिष्य हे शास्त्रीय नाही ,अंधश्रद्धा आहे.परन्तु

लोकांचा ओढा फ़लज्योतिष्याकडे आहे.

काही लोकांनि गणिते करताना काही गणिते न जुळल्यामुळे फ़लज्योतिष्याचा आधार घेतला

आहे.त्यामुळे त्याची   महाभारत व इतर काळाची उत्तरे चूकली आहेत.  रामायणातील

व महाभारतातील खगोलशास्त्राच्या वर्णनात फ़लज्योतिष्य  नाही तर ते निव्वळ आकाशातील

जसे दिसते तसेच वर्णन आहे.(आकाशदर्शन)

भारतीय खगोलशास्त्र इ.पू.१३९०१ च्याही पूर्वीचे आहे.उदा.२८ सप्टेंबर इ.पू.१३९०१

रोजी ,वैशाख शु.३ व अक्षत्रुतीया होती व कृतायुगारन्भ होता.तो दिवस अजून आपण

पाळतो.त्या दिवशी सूर्य शरदसंपात बिंदूत होता. चार युगारन्भाच्या तिथ्या विष्णुपुराणात

दिल्या आहेत. त्यांची गणिते मी केली असून त्या तिथ्या बरोबर येतात.

विशेष म्हणजे त्यांचा संबंध संपातबिंदू व उत्तरायण/दक्षणायनाशी आहे.