वरील मतांशी सहमत. गजल छान आहे. 'हुस्ने-मतला' असलेले २ शेरही विशेष.

आली थेट इथे मनात बसली, बोलून गेली तरी
नाही बेत तिचे मला समज़ले, ती केवढी धोरणी!

गेलो बोलविले म्हणूनच तिथे, मी सत्य ते बोललो
(त्याच्यानंतर मात्र फार तसली आली न बोलावणी)

आता ह्या इवल्या जगात मजला कोंडून मी घेतले
आल्या तोच कश्या इथे दशदिशा लांबून सार्‍याज़णी?... हे शेर फार आवडले.