शेती ही अशी एकमेव इंडस्ट्री आहे, जिच्यात मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसवर तिच्या मालकाचे पूर्ण नियंत्रण नसते.

हे जरा आपण थोडे विस्ताराने सांगाल का? नैसर्गिक बदल, पावसापाण्याच्या लहरी असे फॅक्टर्स तर आपणाला अभिप्रेत नाहीत? तसे बघायला गेले तर बऱ्याच व्यवसायात अकस्मात होणाऱ्या एन्वायरमेंटल बदलांमुळे अकस्मात फायदा अथवा अपरीमित नुकसान होणाची भीती असते. उदा. विमान कंपन्यांना इंधनाचे हेद्-जिंग करावे लागते, त्यात कितीतरी रिस्क आहे. पेस्टलचे महत्त्व सर्वच व्यवसायांना सारखेच असते, नाही का?

बरे शेतीसंबंधिचे आपले विधान खरे मानले, तरी आत्महत्या विदर्भातले शेतकरीच का एव्हढ्या संखेने करतात? 'शेतकऱ्यांच्या आत्महत्या' ह्या चर्चेत हेच मी विचारले होते, पण काही हाती लागले नाही.