हे वाक्य याच अर्थाने वापरलेले आहे. परंतु आजही बरेचसे शेतकरी कर्ज काढून मुलींची लग्ने करताना दिसतात. हा प्रकार केवळ शेतकऱ्यांच्याच बाबतीत असतो असेही नाही. पण शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधन हे कर्ज फेडण्याइतके सक्षम नसते. या अर्थाने मला रुढींच्या दबाबाने का होईना पण ही एक प्रकारची उधळपट्टीच वाटते. म्हणूनच आपत्कालीनतेचे काही विशिष्ट अपवाद असू शकतात, असे म्हटले आहे. या अपवादात मी दुष्काळाने नापिकीची आपत्ती किंवा अशाच प्रकारच्या मानवी कक्षेच्या बाहेरच्या गोष्टींचा समावेश करेन . शेतकऱ्यांच्या कर्जात बरेचसे कर्ज अनुत्पादक स्वरूपाचे असते, या गोष्टीकडे मात्र आपले लक्ष वेधावे वाटते.