......तरी आत्महत्या विदर्भातले शेतकरीच का एव्हढ्या संखेने करतात? 'शेतकऱ्यांच्या आत्महत्या' ह्या चर्चेत हेच मी विचारले होते,

मध्यंतरी यदुनाथ सरकारांचे " औरंगजेब " हे चरित्रात्मक पुस्तक वाचत असताना त्या पुस्तकात हाच मुद्दा स्पर्शून गेला आहे. औरंगजेब औरंगाबादेचा म्हणजेच आजच्या विदर्भ मराठवाड्याचा (त्या काळात मराठवाडा विदर्भाचाच एक भाग होता.)सुभेदार होता. त्या परिसरात त्या काळातही दुष्काळ सातत्याने पडत असल्याचे उल्लेख सरकारांना ऐतिहासिक कागदपत्रात सापडल्याचा संदर्भ मिळतो. याचा अर्थ त्या परिसरात शेतकऱ्यांच्या समस्या हा प्रश्न आजचा आहे असे मानता येत नाही. फक्त आता हा प्रश्न सर्वच प्रदेशातील शेतकऱ्यांचा झाला आहे, त्यात वैदर्भीय शेतकऱ्यांचे प्रमाण आजच्या परिस्थीतीमुळे स्वाभाविकच वाढले आहे. म्हणून ते तीव्रतेने समोर येते इतकेच.