आपल्या दैनंदिन कामाच्या निमित्ताने काही पेशांतील व्यक्तिंचे अनेक प्रकारच्या लोकांशी संबंध येत असतात. ह्यांतून अशा व्यक्तिंपाशी तऱ्ह्तऱ्हेच्या वेगवेगळ्या अनुभवांची शिदोरी साठलेली असते. ती नक्कीच उघडून बघण्यालायक असते. चपळगावकरांचे पुस्तक हा त्याचाच एक नमुना.

सध्या मनोगतावर दूसरा एक लेख हवाईसुंदऱ्यांच्याबद्दलचा (ह्याहून अधिक रास्त मराठी शब्द मला आठवला नाही, म्हणून क्षमस्व. कुणीही गैर मानून घेउ नये, ही विनंती) काही इतर कारणांमुळे गाजत आहे. त्या लेखाच्या सुरुवातीला मलाही असेच काही, त्या स्त्रियांना त्यांच्या कामानिमित्त येणाऱ्या अनुभवांबद्दल लिखाण असेल असे वाटले होते, पण निराशा झाली.