या विषयावर असलेली अन्य लेखकांची पुस्तके मी वाचल्यानंतर मला त्यातील काही भाग

चूकीचा वाटल्यामुळेच मी " महाभारत युद्धकाळ'' हे पुस्तक लिहिले आहे̱. मला ईतर

लेखकावर जाहीर टीका करणे आवडत नाही.पण सर्वसाधारणपणे मी असे म्हणेन की

एकदा शास्त्रीय लिखाण करावयाचे ठरविल्यानंतर त्यात धर्म,अध्यात्म,फ़लज्योतिष्य, इ.

चा आधार घेणे अयोग्य आहे.मी फ़क्त खगोलशास्त्रीय वर्णनाचा व ज्योतिष्यगणिताचा उपयोग

केला आहे.तसेच माझे पुस्तक न वाचताच तुलना करू नये.सायन पद्धतीने कोणी आकाशदर्शनाचे वर्णन करेल ही कल्पनाच अशक्य वाटते.तसेच जे लेखक व्यासाचेच काही

श्लोक चूकीचे आहेत असे म्हणतात त्यावर जास्त काय बोलणार?