सुधीर, विद्या आणि विश्वास उजाड माळ पाहून चकित होतात. येथे काहीतरी भलतेच पाणी मुरत आहे याचा त्यांना संशय येतो आणि ते घाईघाईने घरी परततात. घरी येऊन कपाटे, सेफ्स, लॉकर्स उघडून पाहतात तर सर्व काही सफाचट. सुधीर इंटरनेटवर ऑनलाईन जाऊन आपली बँकेतील शिल्लक तपासतो. तेथेही खडखडाट. विश्वासही आपले अकाउंटस तपासतो आणि त्यालाही तोच अनुभव.
आपल्या गैरहजेरीत घराची शुक्राचार्य आणि त्यांच्या यांत्रवांनी पुरेपुर काळजी घेतली होती याची पत्ता तिघांना लागतो. कपाटाच्या चाव्या, खात्यांचे पासवर्डस यांत्रवांनी आत्मसात (हॅक) करून आपल्याला मोठा गंडा घातल्याचा त्यांना उलगडा होतो.
एवढाच शेवट सुचला परंतु एखाद्या विज्ञानकथेला पूरक वाटला नाही.