पूर्वकल्पना न देता येणाऱ्या पाहुण्याना मात्र आम्ही येईपर्यंत तो घरात घेत नसे आणि जर आम्ही घंटीचा संकेत विसरलो तर अगदी शिवाजी राजांच्या मावळ्यासारखा आम्हालाही !

याही वाक्यावरून मोहन यांत्रव असल्याची खात्री पटते. त्यामुळे स्मिताच्या प्रेमात पडणे, पळून जाणे (आणि नंतर लग्न-मुले की काय?) ही कल्पना बाद ठरावी.

वरील कल्पना मलाही सुचली होती कारण माळरान एकदम उजाड वगैरे झाले. (स्टिवन स्पीलबर्ग की जय!) लिहायला कंटाळा केला.

शेवट २:

परग्रहावरुन आलेल्या स्मिता, मोहन या आपल्या यंत्रवांसकट डॉ. शुक्राचार्यांनी पोबारा केला होता. पृथ्वीवरचे जीव कसे वागतात, काय खातात, कशाला महत्त्व देतात, कसे विचार करतात, कोणती कामे करण्यात आळस करतात  या सर्वांचा मुबलक विदा जमा करून त्यांनी आपल्या ग्रहाच्या दिशेने उड्डाण केले...... भविष्यात पुन्हा परत येण्यासाठी!!!!!