त्यासाठी 'पडलो तरी नाक वर' ही मराठी म्हण अपुरी पडत होती?

वर्तमानपत्रांनी हिंदीच्या प्रभावापासून सावध असावे असे मलाही वाटते. विविध भाषांतून नव्यानव्या गोष्टींसाठी नवे शब्द घेणे ठीक आहे. त्यामुळे भाषेचा प्रवाह वाहता राहतो, हे मान्य. पण रुळलेले शब्द असताना सरसकट परभाषिक शब्द, म्हणी, वाक्प्रचार वापरण्याने मराठीचा प्रवाह मोठा होईल कदाचित मात्र त्याची खोली हरवून बसेल. त्यामुळे तारतम्य बाळगणे आवश्यक आहे.