मंडळी, प्रवासींची रचना वाचून ज्या काही ओळी सुचल्या त्या प्रतिसादात लिहीते आहे. मूळ रचनेच्या तोडीची रचना करायला मोठ्या प्रतिभेची गरज असते पण म्हणून अशी सुंदर रचना वाचल्यावर मनात आलेले लिहायचे नाही असे कुठे आहे?जुळवाजुळव करावी लागली फ़ार ..तरी मनासारखे होईना.  पण हा पहा एक प्रयत्न.

जगही रितेच आहे
सखये तुझ्याविना हे जगही रितेच आहे
सखये तुझ्याविना हे हसणे मुकेच आहे

बघते कशास आता मागे वळुनी मजला
दुखवून तुझे जाणे मज लाडकेच आहे

विझले जरी प्रिये आशादीप तेवणारे
मम ओठी उरले बघ, गाणे तुझेच आहे

कळली मनामनासी अंतस्थ वेदना रे
चढवू नको मुखवटा स्वागत तुझेच आहे

मक्त्त्याविना गजल असे अधुरे जीवनगाणे 
तुटता रेशम गाठी खोलवर ठेच आहे
-सोनाली जोशी