जत्रेत खुंट्यांमध्ये लांबून कड्या टाकण्याचा एक खेळ असतो. त्यात भाग घेण्यात स्वारस्य नसणाऱ्यांचे दोन प्रकार असतात. एकतर अगदी जवळून सोप्या ठिकाणाहून कड्या फेकतो किंवा अगदी लांबून कमालीच्या अवघड ठिकाणाहून कड्या फेकतो. ज्याला ह्या खेळात अधिकाधिक कौशल्य संपादन करून प्रावीण्य मिळवायचे आहे तो आपला जास्तीत जास्त कस लागेल अशा ठिकाणाहून कड्या फेकू पाहतो. ... हे मॅक क्लीलंड ह्या शास्त्र्ज्ञाने सिद्धी अभिमुखतेविषयी (अचीव्हमेंट ओरिएंटेशन) लिहिताना दिलेले उदाहरण आहे. पहिल्या दोन्ही गटातल्ल्या लोकांना ही सिद्धी अभिमुखता नसते. तिसऱ्याला असते.

हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे आपले प्रभावी निवेदन. काय केल्याने मराठीचा विकास होणार नाही आणि काय केल्याने होईल हे आपण इतक्या नेमकेपणाने सांगितले आहे, की त्यामागे आपली मराठीच्या विकासाची तळमळ त्यासाठे तुम्ही केलेला अभ्यास, कष्ट आणि एकंदरच अनुभवाचे किती पाठबळ आहे ते स्पषट जाणवते आहे.  आपण जर पायरी पायरीने हा विकास कसा करायचा ते एक वेगळा लेख/चर्चा तयार करून सांगितलेत तर सर्वांनाच आपल्या मार्गदर्शनाचा फायदा होईल, असे वाटते.

हे सगळे घडू शकेल ते वार्ताहर-मास्तरांमुळे नव्हे, तर समर्थ -समृद्ध -सार्वभौम स्त्रीपुरुषांच्या वाढत्या संख्येतूनच. आणि हे कसे घडवता येईल, यावर खरेतर चर्चा व्हायला हवी.

सहमत. आपण च अशी चर्चा सुरू करावी आणि तिच्यात सातत्याने भाग घेऊन विकासाची दिशा दाखवावी ही विनंती.

नाहीतर हा केवळ उमदेपणाचे ध्येय दाखवून वरच्या पहिल्या दोन उदाहरणातल्या दुसऱ्या उदाहरणासारखा स्वारस्यहीन उपद्रव आहे असे आपल्या प्रयत्नांचे चुकीचे वर्गीकरण होण्याचा धोका आहे.