या यादीतले सर्व शब्द मराठी माध्यमातून अकरावी मॅट्रीक / दहावी मॅट्रीक आणि नंतर विविध क्षेत्रात पदवीधर असणाऱ्यां ५० जणांना दाखवले व त्यांनी सुचवलेले पर्याय/ मते पुढीलप्रमाणे

  1. फाईलमध्ये लावली पाहिजे. - ३५ जणांनी फायलीमध्ये तर दोघांनी टाचणवहीत असे सुचवले इतरांना फाईलमध्ये आक्षेपार्ह वाटले नाही.
  2. टिकमार्क करत जातो. - ३० जण  खुणा करत जातो असे म्हणाले तर २० जणांना टिकमार्क शब्दात काही गैर वाटले नाही.
  3. स्टेपलर आहे काय? -टाचणयंत्र २० जणांनी मान्य केले , २५ स्टेपलर योग्य वाटले, बाकीचे निर्णय घेऊ शकले नाही.
  4. ऍरेंजमेंट केली आहे का? व्यवस्था / जुळवणी / तजबिज एकमताने मान्य झाले
  5. मालिश केल्यास तुला बरे वाटेल. -मालिश
  6. बूट पॉलिश करुन घे. -- तोच ठेवावा असे बहुमत
  7. तिकीटे काढली आहेत काय? तिकीटे असे बहुमत
  8. ऑपरेशन  - एकमताने शस्त्रक्रिया
  9. वर्ल्डकप  - विश्वचषक - एकमताने
  10. पॉईंट - मुद्दा - एकमताने
  11.  ड्रेसकोड  - वस्त्रसंकेत/ वेषभूषा नियम
  12. टेंट -तंबू- एकमताने